रोहित पवारांनी घेतला नगर मतदारसंघाचा आढावा


अहमदनगर/प्रतिनिधी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रोहित पवार यांनी नगरमध्ये येऊन मतदारासंघाचा आढावा घेतला.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी अहमदनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार अरुण जगताप यांची नगरमध्ये भेट घेतली. आमदार संग्राम जगताप यांनी रोहित पवार यांचे स्वागत केले. यावेळी पवार यांनी आमदार जगताप यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून रोहित पवार यांच्यावर जबाबदारी आहे. सकाळी पवार यांनी नगरमध्ये दाखल होत जिल्हाधिका-यांची भेट घेत जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेतला. भाजपच्या डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार फायनल केलेला नाही. त्यामुळे रोहित पवार नगरला दाखल होत नेमकी काय चाचपणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील नेमका कोण उमेदवार देतात यावर पुढील गणिते अवलंबून आहेत.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सचिन जगताप, बाळासाहेब जगताप, सुजित झावरे, कपिल पवार, ज्ञानेश्वर रासकर, वैभव ढाकणे, अभिजीत खोसे, मयुर जोशी, भुपेंद्र परदेशी, अमोल भंडारे, दत्ता खैरे, रमेश भामरे, संजय कोळगे, गुलाबराव तनपुरे, काकासाहेब तापकीर, अरविंद शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget