Breaking News

साधूंच्या संगतीमध्येच पूर्ण निश्‍चिती - ह.भ.प.कांडेकर


माळवाडगाव /प्रतिनिधी: समाजातल्या प्रत्येक घटकाबरोबर आपल्याला समाधान मिळणे शक्य नाही, परंतु साधूच्या संगतीमध्ये मानवाला पूर्ण प्रकारे निश्‍चिती मिळते, असे प्रतिपादन आचार्य शुभम महाराज कांडेकरयांनी केले. मुठेवाडगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी यावेळी ह.भ.प. वैभव औटी, ह.भ.प. सागर पंडित, ह.भ.प. मुठे , माजी सरपंच तसेच पदाधिकारी,रवी पाचपिंड, पोलीस पाटील मुठे व अनेक भाविक उपस्थित होते.

यावेळी बोलताना कांडेकर महाराज म्हणाले समाजामध्ये माणसाला पूर्णपणे सुखाची अपेक्षा असते व त्या अपेक्षमुळे तो प्रत्येकाकडून याची याचना करतो, परंतु हे परमार्थ सुख कोणाकडेहीमूळतः नसते व तमुळे ते सुख कोणीही कोणाला देऊ शकत नाही. म्हणून हे सुख फक्त काही विशिष्ट लोकांकडे असते आणि ती मंडळी म्हणजे साधूसंत. साधूसंतच या परमार्थिक सुखाचे दान देऊशकतात व त्यामुळेच मानवी जीवनात सुखाची निश्‍चिती मिळू शकते.