Breaking News

सिम्बॉयोसिस स्किल विद्यापीठात सोनई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण


सोनई/प्रतिनिधी: मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विविध शाखेतील 23 विद्यार्थ्यांनी नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केले आहे. पुणे येथील सिम्बॉयोसिस विद्यापीठ ग्रामीण भागाती महाविद्यालयांशी करार करून त्यांना उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण देते.

सोनई महाविद्यालयाचे या वर्षी विद्यार्थ्यांनी बँकिंग क्षेत्रातील तांत्रिक व व्यवस्थापकीय प्रशिक्षण पूर्ण केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना बँकिंग व संगणक प्रणालीचे व बँकिंग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव आला. हे सर्व प्रशिक्षण संगणक सॉफ्टवेअर आधारित होते. सिम्बॉयोसिस विद्यापीठाच्या मुख्य संचालिका स्वाती मुजुमदार व मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रशिक्षण कार्यक्रमास नेवासे महाविद्यालयाचे 6 विद्यार्थी सहभागी झाले होते. आधुनिक काळातील उपयुक्त व कौशल्य आधारित शिक्षणाचा हा एक नवीन प्रयोग आहे. ही संधी संस्थेचे सचिव उत्तम लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर लावरे, उपप्राचार्य डॉ.अशोक तुवर यांनी उपलब्ध केली.