Breaking News

वीर जवान फौंडेशनची शहीद कुटुंबियांना मदत


कडेगाव /प्रतिनिधी : काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात 14 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी नेवरी (ता. कडेगाव) येथील वीर जवान फौंडेशनच्यावतीने संस्थापक सचिव सुनील चव्हाण सर यांनी आज सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांना 51 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मा.रफिक नदाफ साहेब,सतीश महाडिक,किरण पाटील,मोहन सूर्यवंशी,विठ्ठल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमाबददल वीरजवान फौंडेशनचे कडेगाव खानापुर तालुक्यांसह ठिकठिकानच्या मान्यवरांनी कौतुक केले आहे.