Breaking News

सुवर्ण महोत्सवानिमित्त कृषि विद्यापीठात विविध कार्यक्रम


राहुरी/प्रतिनिधी: महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने विद्यापीठात दि. 29 मार्च, 2019 रोजी स्थापनादिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कृषि प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आलेआहे. डॉ. नानासाहेब पवार सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मिश्रा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. के.पी विश्वनाथा असतील. कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. सुभाष पुरी, डॉ. राजाराम देशमुख तसेच विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता, संशोधन संचालक आणिविस्तार शिक्षण संचालक यांना आमंत्रित केले आहे.

या कार्यक्रमासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. यावेळी होणार्या कृषि प्रदर्शनामध्ये विद्यापीठाने प्रसारीत केलेल्या विविध पिकातील वाणांचे, औजारांचे प्रदर्शन प्रदर्शनस्थळी आयोजीतकरण्यात येणार आहे.