Breaking News

आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी ‘सीव्हिजिल अ‍ॅप’


पुणे : दळणवळणासाठी 19 हजार 842 मतदान केंद्रासाठी म्हणजेच 2हजार 288 सेक्टरसाठी 3 हजार 50 बसेस आवश्यक असून 2 हजार 292 वाहनांची क्षेत्रिय अधिकार्‍यांसाठी आवश्यकता आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहिता भंगाच्या नागरिकांच्या तक्रारी नोंद करुन घेण्यासाठी सीव्हिजिल प उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 

तसेच एनजीआरएस सिस्टीम ऑनलाईन तक्रार नोंदणीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. सैन्यातील सर्व्हिस वोटर्ससाठी ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स्मीटेड पोस्टल बॅलेट सर्व्हीस) यावेळी नव्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट चे मशिनची हाताळणी करण्यासाठी पुणे विभागात 11 हजार 747 ठिकाणी शिबिर घेण्यात आले. तसेच 7 लाख 57 हजार 111 मतदारांनी या मशिनची हाताळणी केली आहे.