Breaking News

अवैध दारु वाहतुकीच्या जीपसह गावठी दारु जप्त


कान्हूर पठार/प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा पोलिस मुख्यालयात नवीन पोलिस अधीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यात पोलिसांकडून अवैध धंदे, अवैध व्यवसायांवर धडक कारवाई करत आहेत. अवैध धंद्यातील लोकांच्या मनात धडकी भरवणारी कारवाई काल कान्हूर पठार येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी केली. या कारवाईत साडे चार लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

घटनेची स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेली सविस्तर माहीती अशी की, आज स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.पवार यांना गोपनिय खबर्‍यांकडून माहीती मिळाली होती की, संभाजी चौघुले हा शिरुर येथून बोलेरो जीपमध्ये गावठी दारुची अवैध वाहतूक करुन कान्हूर पठार व परिसरातील खेडे गावांमध्ये विक्रीसाठी येणार आहे. सदर माहीती खात्रीशीर आसल्याने नगरचे पोलिस अधीक्षक ईश् सिंधु, सागर पाटील, अप्पर पो. अधीक्षक व मणिश कलवानिया सहा.पो.अधीक्षक नगर ग्रामिण यांचे आदेश व सुचने नुसार स्था.गु.शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी ही कारवाई कान्हूर पठार येथे केली. गावामध्ये सापळा लावला असता संध्याकाळी 6.30 वा.एक सफेदरंगाची बोलेरो जीप वेसदरे रोडने कान्हूर बाजारतळावरील सहकारी सोसायटीच्या गोदामाजवळ येताच पोलिसांनी जीपला घेराव टाकत औळख सांगून दारु व आरोपींसह गाडी ताब्यात घेत कारवाई केली.

या कारवाईत बोलेरो जीप व 500 लिटर गावठी दारुने भरलेले 35 लिटरचे चौदा व दहा लिटरचा एक ड्रम असे पंधरा ड्रम अंदाजे पन्नास हजार रूपये किमतीची दारु व सफेद रंगाची बोलेरो जीप अंदाजे किंमत चार लाख रूपये असा एकून चार लाख पन्नास हजार रूपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत करून जीप चालक संभाजी पोपट चौघुले (वय 45) रा. आण्णापुर ता.शिरुर जिल्हा पुणे, हल्ली राहणार गाडीलगाव ता.पारनेर व अशोक कान्हू धोत्रे रा.वडार वस्ती कान्हूर पठार ता.पारनेर दारु विक्रेता यांना ताब्यात घेऊन सदर कारवाईत आरोपी विरोधात पारनेर पोलिस स्टेशनला फिर्यादी पोलिस नाईक सुनिल चव्हाण यांनी महाराष्ट्रदारुबंदी कायदा कलम 65(अ),(ई)83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि.बाजीराव पोवार करत आहेत. सदर कारवाईत स्था.गु.शाखा नगरचे पो.स.ई.ज्ञानेश फडतरे, सोन्याबापू नानेकर, दत्तात्रय हिंगडे, रविंद्र कर्डिले, आण्णा पवार, सुरेश माळी, बाळासाहेब भोपळे यांनी कामगीरी बजावली.