Breaking News

क्रुझर जीपची चोरी


राहाता/प्रतिनिधी:आंबेडकर नगर परिसरात घराशेजारी लावलेली क्रुझर जीप चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शरद यशवंत वाघमारे ( वय 35 रा. आबेडकरनगर) याने राहता पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
शरद मागील दिड वर्षापासून शिवाजी परसराम तांबे यांच्या क्रुझर जीप नंबर एम एच 16 बी एच 4098 या वर चालक म्हनून काम करीत होता. नेहमीप्रमाणेकामावरुन घरी येऊन राहाता पिपंळवाडी रोड वरील नगर पालिकेच़्या शौचालयाजवळ जीप लावली . त्याच दरम्यान हि जीप अज्ञात चोरटयांनी चोरून नेली,