Breaking News

एन.सी.सी. ऑफिसर प्रशिक्षणात कांबळे प्रथम


श्रीरामपूर/प्रतिनिधी

नागपूर येथे कामठी या ठिकाणी घेण्यात आलेल्या देशपातळीवरील एन.सी.सी. ऑफिसर प्रशिक्षणामध्ये गणेश विद्यालयाचे एन.सी.सी. ऑफिसर यांनी मैदानी, लष्करी, लेखी स्पर्धांपरीक्षांमध्ये विशेष प्रविण्य मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला.

भारतीय लष्कराच्या एन.सी.सी. विभागाने कामठी या ठिकाणी देशातील शाळा, महाविद्यालयातील एन.सी.सी. ऑफिसरला नुकतेच प्रशिक्षण दिले. यामध्ये सर्वच राज्यातील शिक्षक प्रतिनिधीउपस्थित होते. प्रशिक्षण काळात ड्रील, शारीरिक क्षमता, शस्त्र हाताळणे, अचूक फायरींग करणे, युद्ध कौशल्य अवगत करणे, मॅपरीडींग, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम इ. सर्व गोष्टींचे कठोर लष्करीप्रशिक्षण दिले जाते. महेंद्र काळंगे यांना कर्नल पांडे, लेफ्टनंट कर्नल राजीव धिंग्रा, रोकश तिवारी, प्रशिक्षक शेरसिंग मनोजकुकमार व प्रशिक्षण अकादमीमधील सर्व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

काळंगे यांच्या यशाचे महाराष्ट्र 57 बटालियनचे कर्नल अजय सूद, कर्नल चिन्वर, प्रा.मधुकर पवार, स्कूल कमिटी अध्यक्ष पांडुरंग गाढवे, उपसरपंच अनिल गाढवे, आदी मान्यवरांनी अभिनंदनकेले आहे.