Breaking News

बाभुळवाडे येथे अखंड हरिनाम सप्ताह -----


पारनेर/प्रतिनिधी: पारनेर तालुक्यातील बाभुळवाडे येथे श्री केदारेश्‍वर देवस्थानच्या भक्ती पंढरी निमित्त सोमवार पासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. यावेळी केदारेश्‍वर महाशिवरात्र सुवर्ण महोत्सव अंतर्गत ज्ञानेश्‍वरी शिवलीलामृत पारायण याचेही आयोजन केले आहे. केदारेश्‍वर सेवाभावी ट्रस्ट बाबुळवाडा ग्रामपंचायत, महाशिवरात्री उत्सव मंडळ, ग्रामस्थ, सेवाभावी सोसायटी, केदारेश्‍वर पत्संस्था, पाणी फाउंडेशन, सर्व तरुण मंडळ, पुणेकर, मुंबईकर मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्‍वरी शिवलीलामृत पारायण सोहळ्याची जोरदार तयारी पूर्ण झाली आहे.

दरवर्षी दीड ते दोन लाख भाविक या अखंड हरिनाम सप्ताहच्या अन्नदानाचा लाभ घेतात. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची पत्नी शालिनी देशमुख या दोघांचीही कीर्तने होणार आहेत. त्याच बरोबर सुभाष महाराज जगदाळे, संजय महाराज कावळे, सचिन महाराज, मोहनानंद महाराज पुरंदरेकर, अमोल महाराज वाकडे, केशव महाराज जगदाळे यांची कीर्तन सेवा सायंकाळी 7 ते 9 या वेळात होणार आहे. यानंतर दररोज अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे.