Breaking News

मोदींचा चरित्रपट वादाच्या भोवर्‍यात


नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. देशात सर्वत्र निवडणूक आचारसंहिता लागली असताना मोदींचा चित्रपट प्रदर्शित करून सत्ताधारी भाजप आणि त्यांचे समर्थक मतदारांना प्रभावित करू पाहत आहे असा आरोप काँग्रेस सह इतर विरोधी पक्षांनी लावला असून याबाबत त्यांनी थेट निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे. 

विरोधी पक्षांच्या तक्रारीची दाखल घेत आयोगाने निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नोटीस पाठविली असून या संदर्भांत चित्रपटाशी संबंधित निर्माते संदीप सिंह आणि दिग्दर्शक ओमंग कुमार यांना 30 मार्च पर्यंत आपली बाजू मांडण्यासासाठी वेळ दिला आहे. या चित्रपटांत विवेक ओबेराय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार असून 5 एप्रिल रोजी एकूण 23 भाषांमधेय हा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.