Breaking News

गारगोटीची तस्करी करणारे पिकअप ताब्यात


श्रीगोंदे/प्रतिनिधी श्रीगोंदे पोलिसानी काल पहाटे चारच्या सुमारास गारगोटीची तस्करी करणार्‍या एका पिकअपचा पाठलाग करून श्रीगोंदे पोलिसांनी पिक अप ताब्यात घेतला. त्यामध्ये दोन टन गारगोटी आढळून आली. श्रीगोंदे पोलिसांनी या कार्रवाइत पाच लाख 53 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जलालपुर या भागातून गारगोटीची तस्करी करणारा एक पिकअप श्रीगोंदे शहरातून जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक विट्ठल पाटील,

पोलिस कर्मचारी अमोल आजबे, संदीप पितले, संतोष धांडे, किसनराव औटी, यांच्या पथकाने काल पहाटे चारच्या दरम्यान मांडवगन रस्त्यावर सापळा लावला. त्याच दरम्यान एक पिकअप ( एम. एच.21- एक्स- 8179) हा पिकअप तिथून वेगात निघून गेला. पोलिस पथकाने या पिकअपचा पाठलाग करून अवधूतनगर परिसरात हा पिकअप रोखला. पिकअपमध्ये क़ाय असे चालकाला विचारले असता गाडीमध्ये मका असल्याचे सांगितले. पोलिस कर्मचारी अमोल आजबे यानी पिकअपची अधिक पाहणी केली असता गाडीमध्ये हिरव्या रँगाचे दगड आढळून आले. पोलिसांनी पन्नास हजार रुपये किमतीची दोन टन गारगोटी, पिकअप असा पाच लाख त्रेपन्न हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

हा दगड म्हणजे गारगोटी असून याची तस्करी होत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पिकअप ताब्यात घेत वाहनचालक नदीम शब्बीर सय्यद रा. अंबड जि.जालना याच्याविरोधात गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी संदीप पितले करत आहेत. 

पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव म्हणाले की, या गारगोटीची तस्करी नेमकी कशासाठी केली जाते. याचा आम्ही शोध घेत आहोत. आणखी कोणत्या भागातून ही तस्करी सुरु आहे. याचाही तपास केला जाणार आहे.