महिला ग्रॅण्डमास्टर भक्तीकडे बुद्धिबळाचे प्रतिनिधित्व


पणजी/वृत्तसंस्था: अस्ताना (कझाकस्तान) येथे पार पडणाऱ्या विश्व सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे भारताचे नेतृत्व गोव्याची महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णी करणार आहे.

भारताला वाईल्ड कार्डद्वारे या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळाला आहे. संघात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय मास्टर इशा करवडे हिचाही समावेश आहे.

अचानक आलेल्या ‘कॉल’ने भक्तीलाही आश्चर्याचा धक्का बसला. भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सचिव भारत सिंग चौहान यांनी भक्तीला तिच्या निवडीबद्दल फोनवरून कळवले. अचानक फोन आल्याने भक्तीची धांदल उडाली. ‘देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणे हे खूप अभिमानास्पदआहे. आघाडीच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या संघात स्थान मिळणे महत्त्वपूर्ण आहे,’ अशी प्रतिक्रीया तिने व्यक्त केली. ती पुढे म्हणाली की, ‘ही मोठी संधी आहे. चीन, रशिया, अमेरिकासारख्या देशाविरुद्ध स्वप्नवत आहे.’

विश्व सांघिक अजिंक्यपदमध्ये दहा देश एकमेकांविरुद्ध खेळतील. यात आॅलिम्पियाड पदकविजेत्यांचा समावेश आहे. आॅलिम्पियाडमध्ये चीनचे वर्चस्व असून त्यांनी यामध्ये सुवर्णपदक मिळवले आहे.

गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या चायना ओपन आणि महिला गटातील विजेतेपद भक्तीने पटकाविले होते. या कामगिरीनंतर भक्तीने फिडेचे लक्ष्य आपल्याकडे वेधले होते. भक्ती ही राष्ट्रीय विजेती सुद्धा आहे. अशी कामगिरी करणारी ती एकमेव गोमंतकीय महिला बुद्धिबळपटू आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget