Breaking News

नगरसेविकेच्या पतीसह चौघांवर अँट्रॉसिटी दाखल


जामखेड/ प्रतिनिधी: पारधी कुटूंबाच्या घरातील संसार उपयोगी साहित्य फेकून देत ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल नगरसेविकेच्या पतीसह चौघांवर अँट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरातील भुतवडा रोड परिसरात एक पारधी कुटूंब राहते. या कुटूंबांकडे मोहन सिताराम पवार , दिलीप गायकवाड ,सनी दिलीपगायकवाड , कांदाबाई दिलीप गायकवाड हे चौघेजण गेले होते. यावेळी त्यांनी पारधी कुटूंबाच्या घराचे कुलूप तोडून घरातील संसारोपयोगी वस्तू घराच्या बाहेर दिले. तेथील महिलेने याबद्दलविचारणा केली असता

आरोपी दिलीप गायकवाड यांच्या पत्नीने त्या महिलेस व तिच्या मुलीला धक्काबुक्की करत जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणातील आरोपींनी यापुर्वी देखील सातत्याने त्रास दिल्याचेफिर्यादीत म्हटले आहे.