Breaking News

‘सीताराम सारडा’ मध्ये विद्यार्थ्यांची अनोखी रंगपंचमी


अहमदनगर/प्रतिनिधी : येथील हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात रंगपंचमी मोठ्या अनोख्या पद्धतीने झाली. यावेळी विद्यालयाच्या कला विभागामार्फत पाच फूट बाय पंधरा फूट मापाच्या भव्य पेपरवर हाताच्या ठशांनी मोठे चित्र रंगविले. नैसर्गिक टेंपरा रंगाच्या विविध रंगी डिशमध्ये विद्यार्थ्यांनी हात बुडवून हवे तसे या मोठ्या कागदावर उमटवित होते. या रंगात खेळण्याचा आनंद विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदांनी घेतला.
‘कलामंच’च्या या उपक्रमाचे आयोजन अशोक डोळसे व विजय कुलकर्णी यांनी केले.