Breaking News

स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण हाच पर्याय- वेदांतिकाराजे


सातारा / प्रतिनिधी: महिलांसाठीची चूल आणि मूल ही संकल्पना आता खूपच दुर गेली आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवत आहेत आणि गर्वाने कार्यरत आहेत. रिमांड होमध्ये अनेक निराधार मुली शिक्षण घेत असतात. या मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी खूप शिकले पाहिजे. शिक्षण हाच स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमीत्त कर्तव्य सोशल ग्रुपच्यावतीने रिमांड होममधील मुलींचा सत्कार, स्नेहभोजन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी अरुणा पोतदार, शारदा बर्गे, लिना माने, मनिषा पवार, उषा खुडे, लतिका येवले, विमल शिंगरे, वर्षा जाधव, सोनिया शिंदे, शितल तुपे यांच्यासह कर्तव्य ग्रुपच्या सदस्या उपस्थित होत्या.