Breaking News

सर्वच क्षेत्रांत महिलांची प्रशंसनीय कामगिरी - डॉ.बिक्कड


श्रीरामपूर/प्रतिनिधी

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी नेत्रदीपक आणि प्रशंसनीय कामगिरी केली आहे. आईच्या रूपात दिसणारी महिला इतर सर्व रूपातही परिपूर्ण असते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्येमहिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. संधी मिळाल्यास अफाट कर्तृत्व त्या दाखवू शकतात. अस्तित्वात असणाऱ्या सर्वच क्षेत्रांत महिलांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे असेप्रतिपादन नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.बाबुराव बिक्कड यांनी केले.

पालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श मातांचा सत्काराचा कार्यक्रम नगराध्यक्षा अनुराधाताई आदिकयांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर बिक्कड बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेविका समीना अंजुम शेख या होत्या. व्यासपीठावरप्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाक पठाण , कलीम कुरेशी, रशीद शेख , अभियंता गवळी आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी मातेपेक्षा अधिक आदर्श समाजात दुसरं कोणी असू शकत नाही असे सांगून पुरस्कार प्राप्त सर्व आदर्श मातांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या समस्यासोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून लवकरच त्या दूर केल्या जातील असे आश्वासनही त्यांनी दिले.

शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा मुख्याधिकारी डॉक्टर बिक्कड व प्रशासन अधिकारी पटारे यांचे हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथाशिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण यांनी केले. सूत्रसंचालन आस्मा पटेल व मिनाज शेख यांनी तर आभार निलोफर सय्यद यांनी मानले.