Breaking News

सैनिकांच्या पत्नीचा सत्कार करून महिलादिन साजरा


पारनेर/प्रतिनिधी
जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने कन्हेर ओहोळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. देशाच्या सीमेवर सैनिक काम करत असतात त्या सैनिकांच्या पत्नी त्या काळात संपूर्ण कुटुंबाचा संभाळ करतात. त्या सैनिकांच्या पत्नींचा व शेतकरी महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका सगुफा शेख यांनी केले होते. यावेळी झुंबरबाई औटी,
भाग्यश्री भिसे, संगीता औटी, निता भिसे, सुजाता भिसे आदी महिला उपस्थित होत्या.