Breaking News

मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विकास गीते


अहमदनगर/प्रतिनिधी : येथील महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विकास गीते यांची बुधवारी (दि.27) दुपारी सर्व संचालक मंडळाच्या वतीने एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात बुधवारी (दि.27) संचालक मंडळाची सभा निवडणूक अधिकारी टी.एस. भोसले (अध्यासी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालय) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चेअरमन पदासाठी गीते यांचे नाव संचालक जितेंद्र सारसर यांनी सूचविले. त्यास प्रकाश आजबे यांनी अनुमोदन दिले. यावेळी व्हा. चेअरमन बाळासाहेब गंगेकर, संचालक बाबासाहेब मुदगल, कैलास भोसले, दिलीप कोतकर, विलास सोनटक्के, किशोर कानडे, सतीश ताठे, बाळासाहेब पवार, अजय कांबळे, नंदा भिंगारदिवे, चंद्रकला खलचे हे उपस्थित होते.