Breaking News

न्यू आर्टस् महाविद्यालयात महिला साजरा


पारनेर/प्रतिनिधी
न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयात आज जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले की, बदलत्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात आपल्यासमोर नव नवी आव्हाने समोर उभी आहेत. अशा वातावरणात व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने खूप अभ्यास करून आपणाला स्पर्धच्या युगात उतरावे लागणार आहे. या दृष्टीने महाविद्यालय नेहमी विविध उपक्रमांची आखणी सातत्याने करत असते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, मराठी विभागप्रमुख डॉ.हरेश शेळके, प्रा. गणेश रेपाळे, डॉ. माया लहारे, डॉ. सुनिता ठुबे, डॉ. प्राजंल भराटे, प्रा. अर्चना फुलारी, प्रा.शुभदा आरडे, प्रा. ज्योत्स्ना म्हस्के, प्रा.रुपाली कदम, प्रा. प्रियंका आतकर उपस्थित होते.