Breaking News

कौशल्याधिष्ठित शिक्षण हीच गरज- बुगे


पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील उपक्रमशील शाळा पिंपरी जलसेन या ठिकाणी दि.28 रोजी इस्त्रो विमान सहलीतील विद्यार्थ्यांचा कौतूक सोहळा व शाळेत चार दिवसांपासून वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र-शाखापारनेर यांच्या सहकार्याने ’छंद वर्ग’ शिबीराचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून पारनेर तालूक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी जीवनात कौशल्याधिष्ठीत शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. छंदामुळे जीवनात आनंद निर्माण होतो म्हणून प्रत्येकाने छंद जोपासला पाहिजे. मानवी जीवनातील ताणतणावाला छंद व कौशल्याधिष्ठित शिक्षण उपयूक्त आहे. असे त्यांनी मत मांडले.

यावेळी विद्यार्थ्यांनी या छंदवर्गात तयार केलेल्या कला-कार्यानुभव विषयाच्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तु, चित्रे, कोलाजकाम, कागदी वस्तु, टोप्या तसेच विविध कलाकुसरीच्या वस्तुंचे त्यांनी कौतुक केले. शाळेच्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. अहमदनगर जिल्हा परिषद आयोजित इस्रो सहलीमध्ये आतापर्यंत तालुक्यातील निवड झालेल्या एकूण 9 विद्यार्थ्यापैकी पिंपरी जलसेन शाळेचे आतापर्यंत 5 विद्यार्थी असून शाळेच्या गुणवत्तेच ते एक प्रतिक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जी.टी.ठुबे, शाळेच्या पदवीधर शिक्षिका रत्नमाला नरवडे, उपाध्यापक मल्हारी रेपाळे, भास्कर औटी, जयप्रकाश साठे, सतीश भालेकर तसेच वनस्थळी संस्थेच्या शिक्षिका आंबेकर उपस्थित होते.