Breaking News

शिवजयंतीनिमित्त शहरात चित्रकला स्पर्धाअहमदनगर / प्रतिनिधी : येथील पद्मशाली सोशल फाऊंडेशनच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रविवारी (दि. 24) चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा सकाळी 9 ते 10.30 यावेळेत मार्कंडेय शैक्षणिक संकुल, दातरंगे मळा, नेप्ती नाका चौक येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी इ. 1 ली ते 4 थी, 5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी असे तीन गट करण्यात आले असून प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांक - रुपये 1 हजार व स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, द्वितीय - रु. 700 व स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकांसाठी रु. 500 व स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार असून उत्तेजनार्थ रु.200 व प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत.

स्पर्धेसाठी विषय:- 1 ली ते 4 थी - शिवाजी महाराजांचे चित्र, 5 वी ते 7 वी - शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग, 8 वी ते 10 वी -देशाची सीमा सांभाळणारे सैनिक किंवा चित्ररुपी - सैनिकांना श्रद्धांजली किंवा राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी मदत करणारे सैनिक असे आहेत. या स्पर्धेस जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष रोहीत गुंडू, अजय लयचेट्टी यांनी केले आहे.