Breaking News

रास्ता रोकोचा इशारा देताच, बसेस थांबण्याचे आदेश


सोनई/प्रतिनिधी : बर्‍याच वर्षांपासून नगर औरंगाबद रस्त्यावरील घोडेगाव-शनिशिंगणापूर फाटा येथे रात्री, अपरात्री राज्यातील सर्वच एसटी बसेस थांबत नसल्याने सोनई येथील श्रावण बाळ सेवा संघाच्यावतीने राजेंद्र एकनाथ निंबाळकर यांनी या ठिकाणी बसेस थांबव्यात म्हणून दि.21 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाकडे आपले सरकार या पोर्ट वर तक्रार नोंदवली होती. त्या तकारारीत रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. 

त्याची दखल घेऊन तातडीने म.रा.प.म.अहमदनगर विभागीय नियंत्रक यांच्याकडून नगर-औरंगाबाद, पुणे, सांगली, सातारा,कोल्हापूर, जालना, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, नांदेड, परभणी, अमरावती, नागपूर, शेवगाव, जामखेड, तारकपूर, श्रीरामपूर, कोपरगाव, पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, अकोले या आगारातील सर्व बसेस यापुढे शनी शनिशिंगणापूर फाटा येथे थांबण्याचे आदेश संभदित आगार प्रमुखांना देण्यात आले आहे.

राज्यातील, जिल्ह्यातील रात्री अपरात्री शनिशिंगणापूर, सोनई, चांदा, घोडेगाव येथील प्रवाशांना चढ उतार करण्यासाठी अडचण होत होती. त्यात महिला, लहान मुले, समान आदी फरफट व्हायची. जुन्या बसस्थानकावर अंधारात ताटकळत उभे राहून घरी जाण्यासाठी प्रवासींना भीती वाटायची. आता शनिदर्शनासाठी व प्रवाशांना घोडेगाव- शनिशिंगणापूर फाटा येथे सर्व बसेस थांबणार असल्याने प्रवासी वर्गातून राजेंद्र निंबाळकर व परिवहन महामंडळाचे आभार मानले आहे. आता निश्‍चित च प्रवासी वाहतूक व्यवस्था वाढणार आहे. या सर्वसामान्य जनतेच्या समस्या आपले सरकार पोर्टवर दाखल करून प्रश्‍न मार्गी लावण्याचे एकमेव युती सरकारचे प्रवासी वर्गातून धन्यवाद दिले जात आहे.