एअर स्ट्राइक नंतरही जैश-ए-मोहम्मदच्या मदरशाची इमारत जशीच्या तशी!


पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आपली मोहीम तीव्र स्वरूपात राबवण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर, 26 फेब्रुवारीला भारतीय वायुदलाने पाकिस्तानविरोधात केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईमध्ये बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदची तळ उद्धवस्त केल्याचा दावा केला. पण, ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला होता, तेथील जैश-ए-मोहम्मदच्या मदरशाची इमारत जशीच्या तशी दिसत आहे. 

यासंदर्भातील नवीन सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रॉयटर्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील एका खासगी सॅटलाइटद्वारे हा फोटो 4 मार्चला घेण्यात आला आहे. या फोटोंमध्ये जैश-ए-मोहम्मदचे सहा मदरसे आजही बालकोटमध्ये असल्याचे स्पष्ट दिसत आहेत. भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक केल्याच्या सहा दिवसांनंतर हे फोटो जारी करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला होता तेथील स्पष्ट चित्र दिसणारे फोटो आतापर्यंत सार्वजनिकरित्या जारी करण्यात आली नव्हती. पण प्लॅनेट लॅब्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोंमध्ये बालाकोट परिसर स्पष्ट दिसत आहे.

 रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार,बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या मदरशांचे कोणत्याही प्रकार नुकसान झालेले नाही, हे सॅटेलाईट फोटोंमध्ये दिसत आहे. शिवाय, मदरशांच्या इमारतींशेजारी झाडेझुडपे देखील दिसत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget