Breaking News

कोडोली शाळेत भरवला चिमुकल्यानी बालबाजार


कार्वे, (प्रतिनिधी) : कोडोली (ता.कराड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये बालबाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या ’बाल बाजाराचे’ उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ. सुनिता जाधव यांनी केले. या प्रसंगी बोलताना सुनिता जाधव म्हणाल्या जि. प. शाळांमध्ये यासारख्या शाळाबाह्य उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थीच्या अंगी असणार्‍या सुप्त गुणांचा आविष्कार व विकास होण्यास मदत होते. तसेच व्यवहारिक ज्ञानाचे धडे प्रत्यक्ष कृतीमधुन शिकण्यास मदत होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जगताप सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांना वजन मापे, पैशाचे व्यवहार लक्षात यावेत यासाठी ’ना नफा- ना तोटा’ या तत्वावर बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले असल्याचे व गणित क्रिया कळाव्यात ,दैनंदिन जीवनाचे ज्ञान व्हावे या उद्देशाने हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला असल्याचे सांगितले.

शेंगा, वांगी, हिरव्या पालेभाज्या, फळे,खाद्यपदार्थ, मनोरंजक खेळ साहित्य उपलब्ध होते. हे साहित्य भाज्या फळे खरेदीसाठी पालकांची झुंबड उडाली. या बाजाराचे खास वैशिष्ट्‌य म्हणजे कुठेही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यात आला नाही. तसेच काही घरगुती वस्तुवर सवलत देखील देण्यात आली होती. या खाद्यपदार्थांचा आस्वाद ग्रामस्थांसह शिक्षक व पालकांनीही घेतला.