Breaking News

निनाईदेवी यात्रेतील करमणुकीच्या कार्यक्रमात गोंधळ


पाटण /प्रतिनिधी : मल्हारपेठ येथील निनाईदेवी यात्रेच्या करमणुकीच्या कार्यक्रमात गोंधळ उडाल्याने अर्ध्या तासात कार्यक्रम गुंडाळला गेल्याने यात्रेकरूंच्या आनंदावर विरजन पडले. छबिना आणि पालखी सोहळ्यातही वादावादीचे प्रसंग ओढवल्यामुळे एकंदरीत या बारा वाड्या आणी तेराव्या मल्हारपेठ यात्रेवर वादावादी प्रसंग आल्याने यात्रा समिती आणि पोलिस प्रशासनाची अक्षरशः तारांबळ उडाली. अयोग्य नियोजनाच्या अभावामुळे ग्रामस्थ यात्रेकरूंमध्ये नाराजी पसरली.
मल्हारपेठ (ता. पाटण) येथील ग्रामदैवत निनाई नवसरी देवीची वार्षिक यात्रा दि 7 रोजी झाली बारा वाड्यांसह मल्हारपेठ, मंद्रुळ हवेली गावाचा यात सहभाग असतो या विभागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून नावलौकिक आहे. निनाई देवीचे मंदिर व संपूर्ण यात्रा ही मंद्रुळ हवेली परिसरात भरते तर यात्रेची पालखी अगोदर दोन दिवस बारा वाड्या व तेराव्या मल्हारपेठमधील वार्डा वार्डात फिरते. त्यासाठी पारंपारिक वाद्य, मुख्य पालखी व मानकरी पालखी घेवुन जात असतात. अशी जुनी परंपरा आहे. त्या प्रमाने जंगी कुस्त्या लावण्याचा बहारदार कार्यक्रम, तमाशा असे कार्यक्रम घेतले जात असतात. मात्र यात्रा समितीच्या अयोग्य नियोजन व प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे यात्रेतील मनोरंजनाच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवता आले नाही. त्यामुळे हजारो रुपये खर्चून घेतलेल्या लावण्यांचा कार्यक्रम काही क्षुुल्लक कारणंामुळे अर्ध्या तासात गुंडाळावा लागल्याने यात्रेकरूना कार्यक्रमाचा आस्वाद घेता न आल्याने ग्रामस्थांचदयातुन नाराजी ऐकावयास मिळत आहे. यात्रा कमेटी, स्थानिक ग्रामस्थ व पोलिस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मल्हारपेठ येथील यात्रेवर वादविवादाचे सावट पडले यामुळे लाखो रुपयांचा चुराडा तर झालाच पण वादविवादामुळे पुढील वर्षाच्या कार्यक्रमावर त्याचा परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.