Breaking News

महावितरणकडून थकीत वीजबिल वसुली मोहीम


कोपरगाव ता./ प्रतिनिधी - तालुक्यातील वीज महावितरणच्या सुरेगाव कोळपेवाडी अंतर्गत वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत असणाऱ्या गावांमध्ये 961 थकबाकीदारग्राहक असून या ग्राहकांच्या सुमारे 6 लाख 48 हजार रुपये विज बिल थकित झालेले आहेत. यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पथक नेमून ही थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यातआली आहे अशी माहिती माहिती सुरेगाव/ कोळपेवाडी विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एस.डी.वाणी यांनी दिली.

सुरेगाव कोळपेवाडी येथील विद्युत वितरण कार्यालयांतर्गत असलेल्या सुरेगाव ,शहाजापूर, कोळपेवाडी, कोळगाव थडी, या गावातील अनेक वीज ग्राहकांचे अनेक दिवसांपासून वीज बिलथकलेले आहे. यासाठी वितरणचे कोपरगाव तालुका ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता डि.एन. चावडा यांचे नेतृत्वाखाली वरिष्ठ तंत्रज्ञ नागेश पेंढारकर ,अमोल वाकळे ,प्रवीण अंभिरे, सुष्मिताभगत, प्रेमानंद वाकोडे, धनंजय बंद्रे, तसेच तत्रंज्ञ ,विद्युत सहाय्यक ,यांचे माध्यमातून वीज बिल वसुली केली जाणार आहे . या वसुली दरम्यान थकबाकीदारांवर मीटर जप्तीचीही कारवाईकेली जाणार आहे अशी माहिती वाणी यांनी दिली.