Breaking News

पुसेगावमध्ये अंतर्गत रस्त्यांचे जाळे निर्माण करणार : रणधीर जाधव

पुसेगाव / प्रतिनिधी : पुसेगावमध्ये मोठ्या प्रामाणात विकासकामे होत असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि पंचायत समिती सदस्यांच्या फंडातून अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्र्न मार्गी लागणार आहे. या अंतर्गत रस्त्यामुळे पुसेगावच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे मत भाजपचे रणधीर जाधव यांनी व्यक्त केले.

पंचायत समिती सदस्या निलादेवी जाधव यांच्या निधीतून मंजूर झालेल्या पुसेगावमधील अंतर्गत रस्त्याच्या भूमी पुजनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी पंचायत समीती सदस्या निलादेवी जाधव,जेष्ठ नेते सतिश फडतरे,सरपंच हेमा गोरे,भाजपा सरचिटणीस भरत मुळे,उपसरपंच प्राकाश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रणधीर जाधव म्हणाले, पुसेगाव ही बाजारपेठ असून अंतर्गत रस्ता हा महत्वाचा प्रश्र्न आहे. या रस्त्यामुळे पुसेगावच्या विकासाला हातभार लागणार असून लवकरच पुसेगाव मधील सर्व वार्डातील प्रश्र्न मार्गी लागणार आहे, असेही ते म्हणाले. वार्ड क्रमांक चार मधील दोन रस्तांचे आणि स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्ताचे भूमीपुजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच श्रीकृष्ण जाधव, माजी सरपंच दिपालीताई मुळे, पृथ्वीराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव, रोहन देशमुख, वैभव भोसले, प्रविण जाधव, सुशांत जाधव, टी. एन. जाधव, दिपक तोडकर, अंकुशराव पाटील, सौ. सीमा जाधव, ऍड. मुळे, सोपानराव जाधव यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.