Breaking News

चारित्र्यशील कार्यकर्त्यांनी संघटित व्हावे -अण्णा हजारे

पारनेर/प्रतिनिधी

देशामध्ये लोकांची लोकांनी लोकसहभागातून चालवलेली लोकशाही आणायचे असेल तर चारित्र्यशील कार्यकर्त्यांनी संघटित झाले पाहिजे. संघटितपणे होणार्‍या अन्याय अत्याचाराच्या विरोधात अहिंसेच्या मार्गाने संघर्षकेला पाहिजे. यासाठी चारित्र्यशील कार्यकर्त्यांनी संघटित व्हावे असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन या संघटनेमध्ये ज्यांना सभासद व्हायचे असेल त्यांनी आपापले प्रतिज्ञापत्र भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास राळेगणसिद्धी या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णाहजारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. त्यात हजारेंनी ही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र राज्यामध्ये 252 तालुक्यामध्ये आंदोलनाच्या कमिट्या होत्या परंतु काही सदोष कार्यकर्त्यांमुळे सर्व कमिट्या बरखास्त केल्या गेल्याआता फक्त चारित्र्यशील कार्यकर्त्यांचे संघटन करण्याचे ठरवलेले आहे त्याप्रमाणे जे इच्छुक कार्यकर्ते असतील त्यांनी पुढे येण्याची गरज असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

संघटनेमध्ये कार्यकर्ते चारित्र्यशील असणे आवश्यक आहे. अन्यथा प्रभाव पडणार नाही. आंदोलन फक्त संख्यात्मक असण्यापेक्षा गुणात्मक असावे असेही हजारे यांनी म्हटले आहे