Breaking News

पावन गणपती संस्थानच्या प्रमुखपदी ह.भ.प. शास्त्री


शेवगाव/प्रतिनिधी: तालुक्यातील थाटे येथील पावन गणपती संस्थान या ठिकाणी भागेश्वर संस्थान तरडगव्हाण येथील महंत ह.भ.प. रामनाथ शास्त्री प्रमुखपदी निवास झाली. संस्थांमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये निवड करण्यात आली. यावेळी तोंडोळी संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. पांडुरंग झुंबड, भाविक उपस्थित होते.

यावेळी बोलताना झुंबड महाराज म्हणाले महंतांचे जीवन पूर्णपणे सामाजिक हितासाठी असते. त्यामुळे या संस्थानाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी तन मन आणि धनाने सहकार्य करावे.कारण सर्व साधुसंत हे आपल आयुष्य समाजहितासाठी खर्च करत असतात त्यामुळे त्यांचे कार्य हे अनमोल असते . रामनाथ महाराज शास्त्री मागील तीन वर्षांपासून भागेश्वर संस्थेवर मठाधिपती म्हणून विराजमान होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब जायभाये यांनी तर आभार सरपंच रवि जायभाये यांनी मानले.