Breaking News

कबड्डी संघटकांना राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या पालनाचा इशारा




मुंबई: भारतीय हौशी कबड्डी महासंघाची निवडणूक होण्यापूर्वी संघटनेवर न्यायालयाने नेमलेले प्रशासक निवृत्त न्यायमूर्ती एस. पी. गर्ग यांनी सर्व राज्य संघटनांना पत्रेपाठवून राष्ट्रीय क्रीडा संहितेचे त्वरित पालन करण्यात यावेत. अल्पमुदतीच्या या निवडणुकीनंतर होणार्‍या पुढील निवडणुकीसाठी सर्व राज्य संघटनांकडूनसंहितेचे पालन करणारेच प्रतिनिधी पाठवण्यात यावेत, असे निर्देश दिले होते.

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या 6 मार्चला होणार्‍या विशेष सर्वसाधारण सभेची पत्रे जिल्हा संघटनांना गेल्यानंतर राज्यभरातील संघटकांचे धाबे दणाणलेआहेत. कारण भारतीय हौशी कबड्डी महासंघाने पाठवलेल्या नव्या घटनेस मंजुरी या सभेत घेण्यात येणार आहे.

या पाश्वभूमीवर राज्य कबड्डी संघटनेने आगामी राष्ट्रीय निवडणूक दृष्टीपथावर ठेवून संहितेचे पालन करण्याचे धोरण निश्‍चित केले आहे.

मुंबईत 25 फेब्रुवारीला झालेल्या राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत 6 मार्चला सकाळी 11 वाजता शिवाजी पार्क येथील शंकरराव साळवीसभागृहात विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत फक्त अध्यक्ष, सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष हीच पदे क्रीडा संहितेपुरती मर्यादित ठेवावीतकी कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव या पदांनासुद्धा तिचे पालन करणे क्रमप्राप्त असेल, याबाबत चर्चा होऊ शकेल.

राज्य कबड्डी संघटनेने संहिता स्वीकारल्यानंतर स्वाभाविकपणे जिल्हा संघटनांनासुद्धा त्यांच्या घटनांमध्ये बदल करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्हासंघटनांमध्येसुद्धा मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहेत. तूर्तास तरी राज्यातील कबड्डी संघटक राष्ट्रीय क्रीडा संहितेचे नियम आणि त्यातील पळवाटायांचा अभ्यास करून आपली पदे कशी वाचवता येतील, याचा अभ्यास करण्यात गुंतले आहेत.

अध्यक्ष, सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष या पदांवरील किंवा संपूर्ण कार्यकारिणी समिती सदस्याचे वय 70 वर्षांआतील असावे. अध्यक्षस्थानावरील व्यक्ती तीनकार्यकाळ म्हणजे 12 वर्षे सलग किंवा खंडित स्वरूपात कार्यरत राहू शकेल. सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष पदावरील व्यक्तीसुद्धा तीन कार्यकाळ म्हणजे 12 वर्षेकार्यरत राहू शकेल. परंतु त्यासाठी त्याला दोन कार्यकाळांनंतर तिसर्