Breaking News

सावित्रीच्या लेकींनी समाजोद्धाराचे काम करावे - बरसमवाड


खरवंडी कासार/प्रतिनिधी

अनादी काळापासून नारीशक्तीचा जागर भारतीय संस्कृतीने केला आहे. भारतीय संस्कृतीमधे महिलांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. संत बहीनाबाई, संतमुक्ताई , संत मिराबाई, संत जनाबाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदींनी समाजात आदर्श निर्माण होईलसे कार्य करत समाजोद्धार केला. सावित्रीबाई फुलेयांनी स्री शिक्षणाचा वारसा दिला. राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्यसंकल्पनेची प्रेरणा रयतेमधे निर्माण केली . आणि हि खरी ताकद स्त्री मध्ये असते. त्यामुळेसावित्रीच्या लेकींनी समाजोद्धाराचे काम करावे असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते व साहित्यिक बरसमवाड यांनी केले.

भगवान विद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून 'आजची नारी शक्ती व रणरागीणी' या विषयावर बरसमवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेहोते. यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक वर्ग आदी उपस्थित होते.

यावेळी स्वामीनी कीर्तने , आशा मुळे, प्रमीला गायकवाड या महिला शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश थोरात यांनी केले. आभारमारुती खरमाटे यांनी केले मानले.