Breaking News

अनुदान प्राप्त झाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा- सांगळेखरवंडी कासार/प्रतिनिधी
ऐन दुष्काळात शेतकर्‍यांना दुष्काळ अनुदान प्राप्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने अनुदान देऊन सामान्य वर्गाला खुश केले आहे. हेक्टरी सहा हजार आठशे रुपये अनुदान पहीला व दुसरा हप्ता शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग झाले आहेत. तसेच उर्वरीत खातेदारांचे अनुदान बँक खातेनंबर उपलब्ध झाल्यावर खात्यावर जमा करण्यात येइल असे प्रतिपादन तलाठी जालिंदर सांगळे यांनी केले.

खरवंडी तलाठी टाकळी मानुर कार्यालय व तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना अनुदान मिळाल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. दुष्काळ निवारणासाठी सरकार आगामी काळात प्रधानमंञी कृषीसन्मान योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना सहा हजार रुपये मदत देणार आहे. तसेच शाषनाच्या पिकविम्याच्या माध्यमातूनसुद्धा खरीप व रब्बी हंगामात शेतकर्‍यांना भरपाई मिळत असते. त्यामुळे सरकार जनतेच्या पाठीशी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीशी सामना करावा लागत असला तरी सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य वर्गाला लाभ मिळत राहील असे प्रतिपादन तहसीलदार नामदेव पाटील व नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी केले.