प्रियंका राजकारणात सक्रिय झाल्यानंतर दहा लाख कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल

Image result for प्रियंका गांधी
लखनऊः प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्याचा फायदा काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. प्रियंका यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच पूर्व उत्तर प्रदेशची धुरा सोपवण्यात आली होती. यानंतर काँग्रेसमध्ये बुथ स्तरावर तब्बल 10 लाख नवीन कार्यकर्ते सामील झाले आहेत. उत्तर प्रदेशात तर कार्यकर्त्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या दीड लाखावरून साडेतीन लाखांवर गेली आहे.
प्रियंका काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यानंतर फक्त उत्तर प्रदेशच नाही, तर अन्य राज्यातही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश, तमीळनाडू काँग्रेसचा बालेकिल्ला नसतानाही तब्बल अडीच लाख नवीन बूथ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या चार आठवड्यांत काँग्रेसला सर्वाधिक फायदा झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या देशभरातील कार्यकर्त्यांची संख्या 5.4 कोटीवरून 6.4 कोटींपर्यंत पोहोचली आहे. 23 जानेवारी रोजी प्रियंका यांना पूर्व उत्तर प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी त्यांनी सूत्रे हातात घेतली होती.
काँग्रेसच्या डाटा अ‍ॅन्लेटिक्स टीम प्रमुखांच्या माहितीनुसार, प्रियंका यांच्या प्रवेशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, तमीळनाडू, केरळमध्येसुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या, त्याचप्रमाणे बूथ कार्यकर्त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शक्ती मोबाईल अ‍ॅपच्या द्वारे कार्यकर्त्यांचा संख्येत वाढ झाली. प्रियंका यांनी अद्याप जनतेला संबोधित केलेले नाही. 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर प्रियंका यांनी सर्व सभा स्थगित केल्या होत्या. नुकताच लखनऊमध्ये स्थापित केलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रियंका या जनतेच्या त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या प्रश्‍नांचे निराकरण करत असतात.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget