Breaking News

टीआरएसचे जितेंद्र रेड्डी यांचा भाजप प्रवेशनवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या चरणाच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस)वरिष्ठ नेते आणि मेहबूबनगरचे मावळते खासदजितेंद्र रेड्डी यांनी पक्षाला सोडचिट्टी देत बुधवारी रात्री भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेऊन अधिकृतरित्या पक्षात प्रवेश केला.

मेहबूबनगर लोकसभा मतदार संघातून यावेळी तिकिट न मिळालयाने जितेंद्र रेड्डी नाराज असल्याचे समजते. 1999 साली भाजपच्या तिकिटावर सर्वप्रथम रेड्डी मेहबूबनगर येथून लोकसभेवर निवडून गेले मात्र तेलंगणा राज्य आंदोलनाच्यावेळी, पक्षाचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात त्यांनी तेलंगणा राष्ट्र समितीत जाण्याचा निर्णय घेतला आणि 2014 साली मेहबूबनगर लोकसभा मतदार संघातून ते विजयी झाले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रेड्डींचा पक्षबदल हा राज्यातील राव सरकारसाठी मोठा धक्का समाजाला जातो. विशेष म्हणजे एपी जितेंद्र रेड्डी यांनी लोकसभेत तेलंगणा राष्ट्र समितीचे गटनेते म्हणूनही काम केले आहे. भाजपात प्रवेश केल्यांनतर आपल्या भावना व्यक्त करिताना रेड्डी म्हणाले की आत्तापर्यंत मला तेलंगणा राज्यासाठी काम करायची संधी मिळाली पण, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण देशासाठी काम करता येईल असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान डिसेंबर मध्ये घालेल्या तेलंगणा विधानसभेच्या निवडणूकांदरम्यान पक्ष विरोधी काम केल्या मुळे जितेंद्र रेड्डी यांनी डच्चू देण्यात आल्याचे समजते. याआधी काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्या आणि माजी मंत्री डी.के अरुणा यांनी सुद्धा काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. यावेळी अरुणा भाजपच्या तिकिटावर मेहबूबनगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत. तेलंगणा राज्यात एकूण 17 लोकसभांच्या जागा असून त्यासाठी 11 एप्रिल रोजी मदानात होणार आहे.