Breaking News

एकदिवसीय क्रमवारीत झूलन-स्मृती अव्वल स्थानावर


मुंबई/प्रतिनिधी: आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय महिला खेळाडूने वर्चस्व राखले आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत मराठमोळ्या स्मृती मानधनाने अव्वल स्थान कायम राखले आहे. तर गोलंदाजीमध्ये अनुभवी झुलन गोस्वामीने अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. सात वर्षानंतर गोलंदाजी आणि फलंदाजीच्या क्रमवारीत भारतीय महिला खेळाडूंनी अव्वल स्थानवार वर्चस्व मिळवले आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्येही अव्वल स्थान पटकावणाऱ्या झुलनने मालिकेत ८ बळी घेतले. त्यामुळे भारताने चॅम्पियनशिपमध्ये दुसरे स्थान गाठले. न्यूझीलंड व अव्वल चार संघ २०२१विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील. झुलन १,८७३ दिवस जगातील अव्वल गोलंदाज ठरली आहे. यापेक्षा अधिक कालावधीत ऑस्ट्रेलियाची माजी वेगवान गोलंदाज कॅथरीन फिट््जपॅट्रिक हिने २,११३ दिवस अव्वल स्थान भूषविले आहे.