Breaking News

रयत शिक्षण संस्थेत लाईफ वर्करपदी प्रा. संदीप भुजबळ


सातारा, (प्रतिनिधी) : येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या ज्युनियर विभागातील प्रा. संदीप तुकाराम भुजबळ यांची रयत शिक्षण संस्थेत लाईफ वर्करपदी निवड झाली आहे. 

संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून त्या आशयाचे पत्रही त्यांना देण्यात आले आहे. प्रा. भुजबळ हे विद्यार्थीप्रिय व व्यासंगी शिक्षक म्हणून सर्वपरिचित आहेत. या निवडीबद्दल त्यांचे संस्था पदाधिकार्‍यांसह प्राध्यापक, विद्यार्थी व मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.