Breaking News

साईदीप हॉस्पिटलमध्ये मोफत वंध्यत्व तपासणी शिबिर


अहमदनगर /प्रतिनिधी : येथील तारकपूर परिसरातील साईदीप हॉस्पिटलमध्ये साईदीप हेल्थकेअर अ‍ॅण्ड रिसर्च ट्रस्टच्या वतीने दि.8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत वंध्यत्व निवारण व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संपूर्ण एक महिना हॉस्पिटलमध्ये हे शिबिर होणार आहे.

 या शिबिरात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ.वैशाली किरण व डॉ.रझिया निसार, डॉ.अनुराधा राठी या रूग्ण महिलांची तपासणी, उपचार व मार्गदर्शन करणार आहेत. दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत हे शिबीर होणार आहे.
शिबिराबाबत अधिक माहिती देताना डॉ.वैशाली किरण यांनी सांगितले की, आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाची समस्या वाढली आहे. लग्नास अधिक वर्षे झाल्यानंतर मूल जन्माला न येणे, अवेळी मासिक पाळी, गर्भधारणा होवूनही वारंवार गर्भपात होणे, गर्भाशयाला सूज असणे, पुरुषात शुक्रजंतूंशी निगडीत समस्या असणे, वजन जास्त असणे अशा अनेक कारणांनी वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. त्यावर वेळीच अत्याधुनिक उपचार केल्यास विवाहित दाम्पत्याच्या जीवनातील बाळाचे स्वप्न साकार होवू शकते. 

यासाठी साईदीप हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे वंध्यत्व निवारण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या ठिकाणी महिला तसेच पुरुष वंध्यत्व निदान व उपचारांसाठी तज्ज्ञ उपलब्ध आहेत. रुग्णांना येथे जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाने परिणामकारक उपचार मिळतील. शिबिराच्या कालावधीत वंध्यत्वाशी निगडीत तपासण्यांवर सवलत दिली जाणार आहे. या शिबिराचा अधिकाधिक रूग्णांनी लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहिती व नावनोंदणीसाठी मो.9130399072 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.