Breaking News

लोणीमध्ये बिबट्या जेरबंद


कोल्हार/प्रतिनिधी: लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाने अखेर जेरबंद केला. मंगळवारी दुपारी प्ररा मेडिकल ट्रस्ट च्या तीन कर्मचाऱ्यांवर या बिबट्याने हल्लाकरून जखमी केले होते. या हल्ल्यात अक्षय दशवंत ,बाबासाहेब कदम व नानासाहेब भोसले हे कर्मचारी जखमी झाले होते. 

यामुळे मेडिकल ट्रस्ट परिसरात घबराटीचे वातावरण होते.या बिबट्यासंदर्भात वन अधिकाऱ्यांना कळविले असता त्यांनी तातडीने या ठिकाणी पिंजरा लावला. बिबट्याने कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर या ठिकाणी असलेल्या ड्रेनेजमध्ये उडी मारून पलायनकेले.वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी या ड्रेनजच्या चेंबर जवळ पिंजरा लावला. बुधवारी या ड्रेनेजमध्ये अग्निशामक गाडी च्या साह्याने पाण्याच्या मारा केला. चेंबर फोडले व चेंबर जवळ पिंजरालावून सावध भूमिका घेत दुपारी या बिबट्याला जेरबंद केले .वनखात्याचे वन परिक्षेत्र अधिकारी एस.एम. जाधव ,वनरक्षक बी. एस .गाडे ,वनरक्षक जी.बी. सुरासे प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे सुरक्षाअधिकारी यांनी हि कामगिरी केली.