कृषी विज्ञान केंद्र-दहिगावनेच्या व नाबार्ड बँकेच्या शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक


भेंडे/प्रतिनिधी : सहकार महर्षी स्व.मारूतराव घूले पाटलांच्या उद्दात्त हेतूतुन साकारलेल्या शेतकर्‍यांना मार्गदर्शन, कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-नेच्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक भेंडे येथे संपन्न झाली. कृषी विज्ञान केंद्राचे कामकाज मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ. नरेंद्र घुले व मा.आ. चंद्रशेखर घुले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालू असून या बैठीकी दरम्यान कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमाची माहिती केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. कौशिक शामसुंदर यांनी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना अवगत करून दिली. 

बैठीकीपूर्वी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना हिंगे प्रकाश, दहातोंडे नंदकिशोर, प्रकाश बहिरट यांनी शेतकर्‍याच्या शेतावर केंद्राचे चालू असलेल्या उपक्रमांना भेटी देऊन माहिती दिली. सदर सभेसाठी खास अटारी हैद्राबाद येथील माजी शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र रेड्डी उपस्थित राहून केंद्रामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतूक करत या केंद्राचा उपयोग लहान आणि संशोधनाची कमतरता असलेल्या शेतकर्‍यांना होत असल्याचे नमूद केले. सदर बैठकी दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉ.अहिरे, विभाग प्रमुख कृषी विस्तार शास्त्र यांनी कृषी विज्ञान केंद्राने शेतावरील चाचण्या अध्या रेखा प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे यांचे मार्फत जास्तीत जास्त शास्त्रीय ज्ञान शेतकर्‍यापर्यंत पोहचवून शेतकर्‍याचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी विशेष प्रयत्न करावते असे सूचित केले. 

नाबार्ड बँकेचे डी.डी.एम. जगताप यांनी कृषी विज्ञान केंद्र आणि नाबार्ड यांचा समन्वय अधिक दृढ करून पुढील कामकाज व्हावे असे मत व्यक्त केले. शेतकर्‍याने एकत्र येऊन शेतकरी प्रोडूसर कंपनी स्थापन करावी, नाबार्डच्या मार्फत, मशीन, मधुमाशी यासारखे 40 योजनाचा लाभ शेतकरी घेऊ शकतात. त्यासाठी 36% सबसिडी नाबार्ड मार्फत दिली जाते. बदलत्या वातावरणात बदलत्या पिक पद्धती साठी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन अंतर्गत, महिलासाठी प्रशाक्षिणासाठी नाबार्ड मार्फत मदत करते.

 सदर बैठकीस आकाशवाणी, अहमदनगर येथील कार्यक्रम प्रमुख टेकाम यांनी केव्हीके दहीगाव-ने आणि आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या रेडीओ किसान दिन सारखे उपक्रम घेतल्याचे नमूद करून केंद्राच्या विविध शास्त्रज्ञा मार्फत घेतल्या जात सालेल्या पुढाकाराबाबत समाधान व्यक्त करून पुढील उपक्रमास सुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ भास्कर, डॉ.नंदकिशोर दहातोंडे, राहुल कावळे, प्रविण देशमुख, दत्तात्रय वंजारी, अनिल देशमुख, नगरकर, व संजय थोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget