Breaking News

लोहा-कंधार महामार्गावर पाणी मारण्यासाठी सार्वजनीक बांधकाम व कंत्राटदार उदासीन


खरवंडी कासार/प्रतिनिधी : खरवंडी येथून आर्वी येळंब बीड मार्ग जाणारा लोहा कंधार राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सूरु असून रस्त्यावर खडी पसरवली आहे. गेल्या सहा महिन्यापासून काम सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व कंञाटदार रसत्यावर पाणी मारण्यासाठी उदासीन असल्याचे दिसत आहे. गुलशन इन्फोटेक कंपनीने या महामार्गाचे कंञाट घेतले असून बड्या अधिकार्यांशी सलंगमत करुन महामार्गाचे काम जलद गतीने करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. रसत्यावरील धुळीचा ञास नागरीकांना सहन करावा लागत आहे. 

महामार्गाजवळील वास्तव्यास असलेले कुटुंब यांनाही ञास जाणवत आहे. पाथर्डी कडून बीड कडे जाणारी वाहतुक मोठ्या प्रमाणात असल्याने दर तीन तासाला रसत्यावर पाणी मारण आवश्यक असूनसुद्धा कंञाटदार या महामार्गाचे काम कसे चालले आहे हे पाहण्यासाठी फीरकलेसुद्धा नाहीत. याचाच अर्थ कंञाटदार व सार्वजनिक बांधकाम विभाग या कामाकडे जानीवपुर्वक कानाडोळा करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाचे वरीष्ठ अधिकारी अभियंता यांनी दखल घेत संबधीत कंञाटदाराला काम पारदर्शी करण्यासाठी आदेश निर्गमीत करावेत अन्यथा लोहा कंधार राष्ट्रीय महामार्ग काम बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.