Breaking News

किसान कमिटीच्या अध्यक्षपदी रमेश दळवी-------


पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील हंगा येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश बाजीराव दळवी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, किसान काँग्रेस कमिटीच्या नगर दक्षिण अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना 9 मार्च रोजी प्रदेश अध्यक्ष संजय पाटील, काँग्रेस प्रवक्ता प्रसाद खामकर यांनी नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले.
अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहूल गांधींचा दृष्टीकोन त्यांच्यासमोर असलेले उद्दिष्ट, शेतकरी, शेती व शेत मजूर याबाबत काँग्रेसचे धोरण अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आपण काँग्रेस पक्षाचे प्रभावीपणे काम करावे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. 

प्रदेश अध्यक्ष यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वी पणे पार पाडणार असून पुढील काळात शासनाच्या विविध योजना खेडोपाडी राहणार्‍या प्रत्येक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असल्याचेही दळवी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. त्यांच्या निवडीचे परिसरातून कौतुक केले जात आहे.