Breaking News

बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर स्री अग्रेसर : डॉ.कांबळेकर्जत/प्रतिनिधी
स्री आणि पुरुष असा भेद हा पूर्वीपासून आपल्याकडे मानला जातो. परंतु स्री शिवाय पुरुषाला पूर्णत्व नाही. हे आज लक्षात घ्यायला हवे. बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर स्री ही सर्वच क्षेत्रात आज अग्रेसर आहे. पारंपरिक मते सोडून देवून समाजाने स्रियांच्या पाठीशी वैचारिक ताकद उभी केल्यास स्रिया अधिक सक्षम होतील असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी केले. येथील दादा पाटील महाविद्यालयात ‘जागतिक महिला दिन’ कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
या वेळी प्रा. भास्कर मोरे आणि इतर प्राध्यापक उपस्थित होते. महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा गाधी यांनी निर्माण केलेले आदर्श सांगून प्राचार्य डॉ. कांबळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, या महाविभूतींनी स्रियांचे हक्क, समानता व स्वातंत्र या संदर्भात मोठे आदर्श घालून दिले. महिला दिनी या मूल्यांवर विचारमंथन व्हावे, जनजागृती घडावी, त्यांची समाजाने जपवणूक करावी. स्रियांनी ही पुरुष प्रधान संस्कृतीवर भाष्य करताना संयमाने वैचारिक प्रतिकार केल्यास त्या अधिक सबल होतील. यावेळी प्रा, भास्कर मोरे, प्रा. डॉ. संगीता पैकेकरी, विद्यार्थी हरिदास खाटमोडे, कीर्ती जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले.