Breaking News

शहीद जवान राठोड यांच्या कुटुंबियांना श्री औंढेश्‍वर इंग्लिश स्कूलची आर्थिक मदत
देऊळगाव मही,(प्रतिनिधी): पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वीरपांगरा गोवर्धन नगर येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना श्री औंढेश्‍वर इंग्लिश स्कूल अंढेरा यांच्या वतीने आर्थिक मदत 13 मार्च रोजी देण्यात आली. औंढेश्‍वर इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाहिद जवान नितीन राठोड यांच्या कटुंबियाना भेटून सांत्वन करत धीर दिला व आस्थेने चौकशी केली.प्रा.दिलीप सानप व मुख्याध्यापक सुनील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली औंढेश्‍वर इंग्लिश स्कूलचे विध्यार्थी सातत्याने विविध समजोपयोगी उपक्रम राबवितात.

 औंढेश्‍वर इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अंढेरा गावात घरोघरी जाऊन आणि स्वतः ला मिळणारे खाऊचे व चॉकलेटचे पैसे खर्च न करता अशा पद्धतीने आर्थिक मदत गोळा करून ती विरपत्नीस दिली हे विशेष. यावेळी विरपांगरा येथे औंढेश्‍वर इंग्लिश स्कूलचे विध्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाहिद नितीन राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सुनील राठोड, राधेश्याम ढाकणे, विजय आडे, गणेश परिहार, गणेश इंगळे, सुखदेव जायभाये, नालंदा मघाडे, ज्योती बनसोडे, शीतल खंदारे, अश्‍विनी जायभाये, गीता राठोड, सुनंदा इंगळे, सैय्यद मुमताज व औंढेश्‍वर इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी हजर होते.