Breaking News

नान्नजमध्ये प्राथमिक शाळेत विविध वस्तूचा लोकार्पण सोहळा


जामखेड ता/प्रतिनीधी
जामखेड तालुक्यातील नान्नज व परिसरातील सहा प्राथमिक शाळासाठी चौदाव्या वित्त आयोगातून पाणी फिल्टर, कचरा कुंडी, तसेच स्मार्ट एल्ईडी टीव्ही या सर्व वस्तूचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम मान्यवराच्या उपस्थित नान्नज येथील जि.प प्राथमिक शाळेत घेण्यात आला.

जामखेड तालुक्यातील नान्नज ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या बागडे वस्ती, उर्‍हेवस्ती, मोहळकर वस्ती, नान्नज मुले-मुली व उर्दू शाळा या सहा प्राथमिक शाळेसाठी पाणी फिल्टर स्मार्ट एल्ईडी टीव्हीसह कचरा कुंडी या चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या वस्तूचा लोकार्पण सोहळा दि.8 मार्च रोजी नान्नज सरपंच विद्या मोहळकर, उप सरपंच तुळशीराम मोहळकर सह सर्व ग्रा.प. सदस्य तसेच शैक्षणीक क्षेत्रातील सर्व अधिकारी शिक्षक पालक स्कुल कमेटीचे डॉ.सर्जेराव मोहळकर, राजेंद्र मोहळकर, मुख्यध्यापक कांबळे, मुख्यध्यापक विष्णू मोहळकर, मुख्यध्यापक मारूती फड, ऊर्दू शाळेचे मुख्यध्यापक आयुब नाविदगी, मुख्यध्यापक बाबासाहेब कुमटकर, केंद्र प्रमुख सुनिल बुधींवंत, राष्ट्रवादीचे अमजद पठाण, उपसंरपच तुळशीराम मोहळकर, शिवाजी मोहळकर, संजय मोहळकर, सचिन मलंगणेर, अनिल भोसले, नाना भवाळ, तुषार सोनवणे तसेच व्यवस्थापन कमेटीचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य उपस्थित सर्व पालक माता भगीनीच्या उपस्थित घेण्यात आला.

सकाळी 9 वा.बागडे वस्ती 9 30 वाजता उर्‍हे वस्ती 10 वाजता मोहळकर वस्ती येथे प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन व फित कापून सरपंच विद्या मोहळकरसह सर्व सदस्य व शैक्षणी क अधिकारी शिक्षक पालक यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडल्यानंतर नान्नज मुले-मुली व ऊर्दू शाळेतही फित कापून हा लोकार्पण सोहळा घेण्यात आला. यावेळी शिक्षक व पालकप्रतिनिधी यांच्यावतीने ग्रामपंचायतच्यावतीने होत असलेल्या कामाचे कौतुक करुन सरपंच विद्या मोहळकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.