Breaking News

रावेर काँग्रेसला, तर पुणे राष्ट्रवादीला सोडणार?


नवीदिल्लीः पुणे लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. अशातच आता रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याने पुण्याची जागा आता काँग्रेसकडून राष्ट्रवादीला सोडली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत असून पुण्याची जागा राष्ट्रवादीला घेण्याबाबतच्या घडामोडींना वेग आला असल्याची माहिती आहे. रावेर मतदारसंघाच्या बदल्यात काँग्रेसने पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडल्यास राष्ट्रवादीकडून प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी दिली जाईल. त्यामुळे आता पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे चित्र आहे.