Breaking News

अशोक कारखान्याचे ऊस पेमेंट बँकत वर्ग


श्रीरामपूर /प्रतिनिधी: अशोक सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील उसाचे पेमेंट खात्यात वर्ग करण्यात आले आहे. कार्यक्षेत्रातील सभासद, ऊस उत्पादक यांच्यासह कार्यक्षेत्राबाहेरील ऊसउत्पादकांच्या दिनांक 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2019 या पंधरवाड्यात गळीतास आलेल्या ऊसाचे 2 हजार ४४१ रु प्रती टनाप्रमाणे संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यातआल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एल.बी. गाढे यांनी दिली.

त्याचबरोबर यापूर्वी अशोक कारखान्यास गळीतास आलेल्या ऊसाचे राहिलेले रु. 341 प्रती टनाप्रमाणे पैसे लवकरच संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचेहीत्यांनी सांगितले.