Breaking News

लोकसभेसाठी मोदींचा प्लॅन तयार; ही दोन राज्य टार्गेटवर


लोकसभा निवडणुकीचं बिगुल काही दिवसांतच वाजण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधीच आता सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही देशभरात मॅरेथॉन प्रचारसभा घेण्यात येणार आहेत.

मागच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी यांची जादू मोठ्या प्रमाणात चालली होती. लोकसभेच्या 80 जागा असणारे हे राज्य निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मोदींचा याही निवडणुकीत युपीवर फोकस असणार आहे.

उत्तर प्रदेशात मोदी तब्बल 25 प्रचारसभा घेणार आहेत. तसेच पश्चिमबंगाल हे राज्य महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदी प. बंगालमध्ये 15 प्रचारसभा घेतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींचा गड काबीज करण्यासाठी मोदींकडून जोरदार प्रयत्न होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.