Breaking News

झेंडीगेट हनुमान मंदिरात महाशिवरात्री उत्सव


अहमदनगर /प्रतिनिधी : झेंडीगेट येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी (दि.4) सकाळी 9.30 वा. आरती व शिवप्रसादाचे आयोजन करण्यात आले हेाते. प्रारंभी शिवआराधना करण्यात आली. 

अ.नगर मर्चंट बँकेचे विद्यमान संचालक मोहन बरमेचा, विजय मर्दा यांच्या हस्ते महादेवाची व हनुमंताची आरती करण्यात आली. यावेळी साईनाथ कावट, देवस्थान भक्त मंडळाचे सदस्य, भाविक उपस्थित होते. देवस्थानचे प्रमुख रामदास कावट, किसन कावट यांनी उपस्थितांना उत्सवाची माहिती दिली व आभार मानले.
महाशिवरात्रीपासून हनुमान जयंतीपर्यंत हनुमान चालीसा सामुदायिक पठण कार्यक्रमाला शहरात प्रारंभ करण्यात आला आहे.