Breaking News

कोल्हे, भुजबळ, पार्थ यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी


मुंबई / प्रतिनिधीः
राष्ट्रवादी काँग्रेसने काल 11 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज (ता. 15) दुसरी यादी जाहीर केली. अत्यंत बहुचर्चित ठररलेल्या पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरूरच्या उमेदवारीची माळ नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसममध्ये आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या गळ्यात पडली आहे. नाशिकमधून समीर भूजबळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने काल पहिली उमेदवार यादी जाहीर केली. त्यामध्ये माढा, मावळ, बीड, नगर आणि गोंदियामधील उमेदवार घोषित करण्यात आलेले नव्हते. आता दुसर्‍या यादीत मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्या राजकीय प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीकडून अजूनही नगर, माढा आणि गोंदियामधील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार यावर चर्वितचर्वण सुरू आहे.